मुंबईतील कोरोनाच्या भीतीमुळे पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर हजर न झाल्यामुळे 6 पोलीस विरोधात गुन्हा दाखल

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे. परंतु, कोरोनाच्या भीतीमुळे पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीवर हजर न झाल्यामुळे 6 पोलीस कॉन्स्टेबलविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मुंबईतील बोरिवली झोनमधील पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार, ज्या कर्मचाऱ्यांचं वय 50 पेक्षा कमी आहे अशा कर्मचाऱ्यांना ड्युटीवर रूजू होण्यास सांगितले होते. परंतु, 6 पोलीस कॉन्स्टेबल यांनी कोरोनाच्या भीतीमुळे ड्युटीवर हजर झाले नाही. वारंवार सुचना देऊनही या पोलिसांनी ड्युटीवर हजर होण्यास नकार दिला. त्यामुळे कर्तव्यात दोषी ठरवत सर्व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. एवढंच नाहीतर या सहाही पोलीस कर्मचाऱ्यांवर साथीचे आजार कायद्यासह 4 कलमाखाली गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी कारवाई केल्यानंर या सहा पोलीस कर्मचाऱ्यांनी मधील एका पोलीस कर्मचारी ड्युटीवर हजर झाला आहे. दरम्यान,   राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 5257 रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे रुग्णांचा एकूण आकडा 1,69,883  झाला आहे. तर 181 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूची संख्या 7610 वर पोहोचली आहे. राज्यात सध्या 73298 एवढे Active रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुंबईत आज 71 जणांचा मृत्यू  झाला तर 1226 नवे रुग्ण सापडले. सलग चौथ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली आहे.

राज्यात लॉकडाउन वाढला

तर दुसरीकडे, महाराष्ट्रात लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.  MMR परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही.

WhatsApp chat