निगडी मधील दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात, स्वच्छ स्वच्छ पाण्याची मागणी – समाजसेवक दिपक खैरनार

पिंपरी: शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, दुसरीकडे निगडी मधील से.२२ डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे सदर प्रकाराची तात्काळ दखल घेऊन पालिकेने त्वरित स्वच्छ पाणीपुरवठा करावा,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,या परिसरात दाट लोकवस्ती आहे. या परिसरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून अशुध्द पाणीपुरवठा होत आहे.या भागातील नळामधून दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. या पाण्याची दुर्गंधी येत असून यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या दूषित पाणी पुरवठ्यामुळे पोटदुखीचे आजार वाढले असून नागरिक व लहान मुलांना जुलाब उलट्या अशा प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.अशुद्ध पाण्यामुळे असे अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे.त्यामुळे महापालिकेकडून तातडीने ही समस्या सोडवण्यात यावी, अशी मागणी दिपक खैरनार यांनी केली आहे.

WhatsApp chat