पुण्यातील कोरोना झोन झपाट्याने वाढतायत…

पुणेः पुणे शहर व जिल्ह्यात करोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. पुण्यात २० हजारांच्या पुढे रुग्ण संख्या गेल्यानं आरोग्य प्रशासनाची झोप उडाली आहे. रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली असून पुण्यातील कंटेनमेंट झोनमध्ये वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी पुण्यात तब्बल ५० कंटेन्मेंट झोन वाढले असून आता एकूण १०९ कंटेन्मेंट झोन झाले आहेत. १७ जूनपर्यंत पुण्यात ७४ कंटेन्मेंट झोन होते. त्यानंतर ही संख्या कमी होण्याऐवजी आणखीनच वाढत आहे. जुन्या कंटेन्मेंट झोनमध्ये पालिकेनं आढावा घेतल्यानंतर १५ क्षेत्र वगळण्यात आली तर नव्यानं ५० ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोन वाढत असताना पुण्यातील स्थिती अधिक चिंताजनक झाली आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरातील कंटेन्मेंट झोन सील केले आहेत. या भागात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु राहतील. तसंच, पालिकेकडून वेळोवेळी कंटेन्मेंट झोनचा आढावा घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रातील जेष्ठ नागरिक, गरोदर महिला, लहान मुलं यांना अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर जाता येणार नाही. तसंच, प्रतिबंधित क्षेत्रात प्रशासनाने नवे भाडेकरु आणि कामगारांना बंदीचे आदेश दिले आहेत. करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराज अडकत चाललेत! आता कोर्टाची वारी करावी लागणार

पुणे शहरातील रुग्णांची संख्या आता १९ हजाराच्या पुढे गेली आहे. त्यामुळे पुण्यातील स्थिती अधिक चिंताजनक झाली आहे. पुण्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही रुग्ण वाढल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. पुणे शहरात एका दिवसात ६३१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ११ हजार ६७१ रुग्ण बरे झाले होऊन घरी परतले आहेत. ३४४ रुग्ण अद्याप गंभीर असून ५६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. ६६९५ रुग्ण सद्या उपचाराखाली आहेत. दिवसभरात ४ हजार १४० एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

WhatsApp chat