शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही आहे- उमा भारती

भोपाळ |  शरद पवार यांचं मत पंतप्रधान मोदींविरोधात नसून ते भगवान श्रीराम यांच्या विरोधात आहेत, असं टीकास्त्र उमा भारती यांनी सोडलं आहे. कालच्या सोलापूर दौऱ्यावेळी पवार यांनी राम मंदिरावरून पंतप्रधान मोदींना टोला लगावला होता. शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही आहे. ते पंतप्रधान मोदींच्या विरोधात नसून भगवान राम यांच्याविरोधात आहे, असं उमा भारती म्हणाल्या. गणपती मंदिरात पुजा करण्यासाठी त्या आल्या असता त्यांनी पवारांवर टीका केली मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटत असेल. मात्र कोरोनावर उपाययोजना करण्यात आम्ही व्यस्त आहोत, असं शरद पवार म्हणाले होते. कोरोना उपाययोजनांनरून त्यांनी मोदी सरकारला टोला लगावला होता. दरम्यान, शरद पवार यांच्या कालच्या वक्तव्यावर विरोधी पक्षाने जोरदार टीका केली होती. शरद पवार रामविरोधी असल्याची टीका भाजपने केली होती. तर या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना आणून साकडं घालून कोरोना जाणार होता का? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला होता.