‘जय भवानी, जय शिवाजी: अजिबात अनादर केलेला नाही – व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली | राज्यसभा खासदारकीची शपथ घेताना शपथ संपल्यावर भाजप खासदार उदयनराजेंनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशी घोषणा दिली. यावरून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकया नायडू यांनी उदयनराजेंना समज दिली. यावरून बरंच वातावरण तापलं. मात्र या सर्व प्रकरणावर व्यंकया नायडू यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे
.

मी छत्रपती शिवाजी महाराजांचा नेहमीच खंदा आणि जाहीर प्रशंसक आहे आणि देवी भवानीचा उपासक राहिलो आहे. शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत. याची परंपरेनुसार आठवण सभासदांना करुन दिली. अजिबात अनादर केलेला नाही, असं व्यंकया नायडू यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला असता तर मी त्या ठिकाणी राजीनामा दिला असता पण तसं काही झालं नाही व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कालच्या शपशविधीनंतर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावर सोशल माध्यमावरून टीकेची झोड उठली होती.