काँग्रेसच्या बंडखोर आमदारांची किंमत अनलिमिटेड – अशोक गेहलोत

जयपूर | काही दिवसांपासून राजस्थानमध्ये बरीच राजकीय उलथापालथ झालेली आहे. काँग्रेसच्या बंडखोर आमदारांचा घोडेबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आधी १० कोटी रु. असलेली किंमत आता १५ कोटी रु. झालेली आहे, असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. काँग्रेसच्या आमदारांना शुक्रवारी चार्टर विमानातून जैसलमेरमध्ये आणण्यात आले. काँग्रेसचे सर्व आमदार १४ ऑगस्टपर्यंत तेथेच राहणार आहे. राजस्थानच्या राज्यपालांनी विधानसभेचे कामकाज १४ ऑगस्टनंतर सुरू करण्यास संमती दिलेली आहे. याच पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी आवाहन केले की, काँग्रेसच्या सर्व बंडखोर आमदारांनी पुन्हा पक्षात परत यावे राजस्थानच्या या राजकारणावर बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी सरकारच्या विरोधात व्हीप काढली आहे. यावर गेहलोत यांनी टीका केली आहे. या निर्णयामागे भाजप असून या दोघांनाही काँग्रेस सरकार पाडायचे आहे, असं ते म्हणाले. मायावती सरकारविरोधात जी काही विधाने करत आहे,त्यामागे भाजप आहे. भाजप विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी ईडी आणि सीबीआय यांचा वापर करत आहे, याचा दबाव मायावतींवर असल्याने त्या भाजपच्या बाजू घेत आहे, असं गेहलोत म्हणाले.

WhatsApp chat