पुणे जिल्ह्यातील 2 तरुणांची डोक्यात धारदार हत्याराने वार करून हत्या

  • पुणे- पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शिरोली येथील खापरदरा डोंगर माळरानावर 2 तरुणांची डोक्यात धारदार हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास समोर आली.या घटनेमुळे शिरोली परिसरात खळबळ उडाली आहे.

आज शिरोली येथील खापरदरा डोंगरावर गुराखी जनावरांबरोबर गेले. या माळरानावर दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले आणि त्याने याची घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले असून पोलिसांच्या पाहणीदरम्यान दोन्ही तरुणांची डोक्यात धारदार हत्याराने वार करून हत्या केल्याचे निदर्शनास आले. हत्या झालेल्या दोन्ही तरुणांची ओळख अद्याप पटलेली नाही. हत्येचे वेळी आणखी कोणी उपस्थित होतेय काय? पोलीस तपासून पाहत आहेत.