लुटेरी दुल्हनशी लग्न केलं! प्रत्येक लग्नासाठी मिळायचे 10 हजार, म्हणून ८ महिन्यांत केली ६ लग्न!

सध्या लग्नाची व्याख्याचं बदलली आहे. लग्न या पवित्र नात्यात फसवणूक, खून अशा प्रकारच्या धक्कादायक घटना घडतं आहेत. लग्न करून कोटी, लाखो रुपये उकळणं आणि पळून जाणं तर दुसरी कडे पैशासाठी लग्न करून जोडीदारचा खून करणं, असे भयानक प्रकार घडत असल्याचं समोर येत आहे. अशा प्रकारची भयानक घटना मध्यप्रदेश मधील रतलाम येथे घडली आहे. रतलाम येथे राहणाऱ्या एका तरुणाने अशा मुलीसोबत लग्न केलं जीची ओळख लुटेरी दुल्हन म्हणून होती. या लुटेरी दुल्हनने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेवची हत्या केली आणि मृतदेह झाडाला लटकवला. त्यानंतर या लुटेरी दुल्हनचं खरं सत्य उघकीस आलं.

नक्की काय घडलं?

रतलाम येथे राहणाऱ्या एका तरुणाने या लुटेरी दुल्हनशी लग्न केलं. लग्नानंतर दोन दिवसांनी तिने घरी जाण्याचा आग्रह धरला. त्यामुळे नवरदेव तिच्यासोबत घरी जाण्यासाठी निघाला. पण त्या दरम्यान त्याला सासरी जाता काहीतरी गडबड असल्याचं लक्षात आलं. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. तिने नवरदेवच्या हत्येचा कट रचला होता. लोकांना दुसऱ्या दिवशी नवरदेवाचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळला. मग या घटनेनंतर ज्या लुटेरी दुल्हन मुलीशी लग्न केलं होत तिचं धक्कादायक सत्य उघडकीस आलं.

रतलाम जिल्ह्यातील सैलानाजवळ ७ दिवसांपूर्वी हा मृतदेह सापडला. या प्रकरणात पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला. यापूर्वी या आरोपी लुटेरी दुल्हनने राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या अनेक भागात खोटं लग्न करून कुटुंबियांना लुटलं असल्याचं सत्य उघकीस आलं. दरम्यान सैलानाजवळ सापडलेल्या मृतदेहाचं नाव महेंद्र मोतीलाल कलाल असं असून तो २९ वर्षांचा होता. या लुटेरी दुल्हनचं नाव मीनाक्षी असं आहे. हिने नवरा महेंद्रची हत्या करण्याचा कट रचून त्याची हत्या करून ती आपल्या टोळीसोबत फरार झाली होती. ही माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाला सुरुवात केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, महेंद्र आणि मीनाक्षीचा मॅरेज ब्युरोमार्फत लग्न झालं होत. लग्नाकरिता मीनाक्षीच्या खोट्या भावाने अडीच लाख रुपये घेतले आणि त्यानंतर न्यायालय आणि कुटुंबाच्या सहमतीने दोघांनी लग्न केलं. दोन दिवसानंतर मीनाक्षीचे नातेवाईक म्हणून आलेल्या चार जणांनी महेंद्रला त्यांच्या गाडी बसवलं आणि हत्येचा कट पार पाडला. त्यानंतर मीनाक्षीच्या फोन नंबरवरून पोलिसांना तिला शोधून काढले आणि तिच्या टोळीसकट तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. मग चौकशीत मीनाक्षीनं पोलिसांना सांगितलं की, तिला एका लग्नासाठी दहा हजार रुपये मिळत होते. आतापर्यंत तिने राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमधील अनेक ठिकाणी खोटी लग्न केली. तिने ८ महिन्यांत ६ लग्न केल्याची धक्कादायक माहिती दिली.