पिंपरी पालिकेत आभियंता दिन साजरा

पिंपरी दि. १५ सप्टेंबर २०२०) :- भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अभियंता दिन दि. १५ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. पिंपरी चिंचवड महानगर पालिका ज्युनियर इंजिनिअर्स असोसिएशन मार्फत या दिनानिमित्त अभियंता दिन मंगळवार दि.१५/०९/२०२० रोजी साजरा करण्यात आला.

सद्यस्थितीत कोव्हीड-१९ मुळे या वर्षी अभियंता दिन मर्यादित स्वरूपात ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. सदर कार्यमामध्ये महापालिकेच्या मुख्य इमारतीचे तळमजल्यावर सकाळी १०.४५ वा. शहराच्या प्रथम नागरिक महापौर उषा (माई) ढोरे यांचे शुभ हस्ते भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून द्विप प्रज्वलन करण्यात आला व अभिवादन करण्यात आले.

तदनंतर, मा. स्थायी समिती सभागृह, मुख्य इमारत, पिंपरी, येथे वेळ स. ११.०० ते दु. १२.३५ या वेळेत महापालिकेच्या अभियंत्यांना प्रशिक्षण व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत महत्वाचे विकसित केलेल्या व चालू असलेल्या प्रकल्पांचे मनपाच्या अभियंत्यांनी तयार केलेल्या चलचित्रीकरणासह गाण्याचे प्रकाशन मा. महापौर यांचे हस्ते फेसबुकलाईव्ह व यूट्यूबवर प्रसिध्द करण्यात आले. मनपा अभियंत्यांनी सादर केलेल्या रेकॉर्डींग स्वरूपात गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.

प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये संबंधित क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षांचे शुभहस्ते दिप प्रज्वलन व भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतीमेस पुष्पहार व अभिवादन करण्यात आले. त्यावेळी, मुख्य इमारतीच्या कार्यक्रमामध्ये तुषार हिंगे, उप महापौर, संतोष लोंढे, अध्यक्ष, स्थायी समिती, नामदेव ढाके, सत्तारूढ पक्षनेते, राजू मिसाळ, विरोधी पक्षनेता, श्रावण हर्डीकर, आयुक्त, संतोष पाटिल, अति. आयुक्त (१), अजित पवार, अति. आयुक्त (२), प्रविण तुपे, अति. आयुक्त (३), राजेंद्र पवार, उपसंचालक, राजन पाटिल, शहर अभियंता, मकरंद निकम, सह शहर अभियंता, श्रीकांत सवणे. सह शहर अभियंता, रामदास तांबे, सहशहर अभियंता, अशोक भालकर, सह शहर अभियंता, सहा. आयुक्त- जन संपर्क विभाग, सहा. आयुक्त- प्रशासन विभाग, अंबर चिंचवडे, अध्यक्ष- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ, ज्युनिअर इंजिनिअर असोसिएशनचे जयकुमार गुजर – अध्यक्ष, सुनिल बेळगांकर- कार्याध्यक्ष, संतोष कुदळे- कार्याध्यक्ष व इतर पदाधिकारी तसेच अभियंता व कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम मनपाच्या फेसबुकलाईव्ह, यूट्यूबवर तसेच इन्स्टाग्रामवर प्रसिध्द करण्यात आले.