काही लोकं केवळ चर्चेत राहण्यासाठी सुशांतच्या नावाचा वापर करतात

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला आता 3 महिने उलटून गेलेत. या प्रकरणात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. तर सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी आता अभिनेत्री निया शर्माने भाष्य केलं आहे. सुशांतच्या आत्महत्येनतंर अनेक जणांनी यावर विविध पद्धतीने भाष्य केलं. यावरून निया म्हणाली की, “काही लोकं केवळ चर्चेत राहण्यासाठी सुशांतच्या नावाचा वापर करत आहे. असं करू नका.” एका मुलाखतीदरम्यान नियाने हे वक्तव्य केलं आहे. ती पुढे म्हणते, चर्चेत राहण्यासाठी सुशांतच्या नावाचा गैरवापर केला जातोय. मुख्य म्हणजे ज्या व्यक्तींचा या प्रकरणाशी संबंध नाहीये त्या व्यक्तीही केवळ बेडवर बसून या विषयी ट्विट करतायत. सीबीआय या प्रकरणाचा तपास करतेय.”

“सीबीआयच्या तपासानंतर या प्रकरणातील सत्य समोर येईलच. मात्र अर्धवट माहितीच्या जोरावर कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवणं योग्य नाही. म्हणून मी या प्रकरणासंदर्भात शांत असते. कारण सुशांतच्या नावाचा गैरवापर करून मला प्रसिद्धी मिळवायची नाही,” असंही नियाने स्पष्ट केलंय.