पोलीस दलात विविध पदांवर जवळपास 12,538 पदांची भरती होणार

मुंबई | राज्य सरकारने पोलीस भरतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्य पोलीस दलात विविध पदांवर जवळपास 12,538 पदांची भरती भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस भरतीच्या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणांना संधी मिळेल, असा विश्वासही अनिल देशमुख यांनी व्यक्त केला आहे. तसंच या भरतीसाठीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचंही देशमुख यांनी म्हटलं आहे. भरती प्रक्रियेचा आराखडा लवकर करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील पोलीस दलातील ही सर्वात मोठी भरती असल्याचं देशमुख यांनी सांगितलं आहे.

दरम्यान,  डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे. दोन महिन्यांपुर्वी अनिल देशमुख यांनी 12 हजार 538 पदांची भरती होणार असल्याची माहिती ट्विट करून दिली होती.