वाकड-कस्पटेवस्ती परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार, स्थायी समिती अध्यक्षा ममताताई गायकवाड

वाकड-कस्पटेवस्ती परिसरातील पण्याचा प्रश्न सुटणार, स्थायी समिती अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड

पिंपरी ( प्रतिनिधी) स्थायी समितीच्या सभेत वाकड-कस्पटेवस्ती परिसरातील नवीन २५ लाख लिटर पाण्याच्या टाकीच्या एकूण र.रु.४,५८,६८,०२८ (चार कोटी अठ्ठावन्न लाख आडूसष्ठ हजार अठ्ठावीस रु.) खर्चाच्या कामास स्थायी समिती अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड यांनी मंजुरी देत हा विषय तत्काळ मंजूर केला

. वाकड-कस्पटेवस्ती परिसरात उभारणाऱ्या मोठमोठ्या गृहनिर्माण संस्थांमुळे भविष्यातील पाणीपुरवठ्यावर येणारा ताण लक्षात घेता तत्कालीन नगरसेवक विनायक गायकवाड यांनी ह्या पाण्याच्या टाकीसाठी २०१३ पासून निधी मंजूरी पासून ते प्राधिकरणकडून टाकीसाठी जागा हस्तांतरित करण्यापर्यंत विशेष असे प्रयत्न केलेले होते

टाकीमुळे वाकड-कस्पटेवस्ती परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या परीसारतील जुन्या असणाऱ्या पाईपलाईन व लिकेज यामुळे पाण्याची गळती होऊन पाण्याचा दाब कमी होत आहे आणि त्यामुळे पाणीपुरवठ्यावर ताण येत असल्याने स्थायी समिती अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड संपूर्ण वाकड-कस्पटेवस्ती परिसरामध्ये अमृत योजनेअंतर्गत नवीन HDPE पाईपलाईन टाकण्याचे काम चालू केलेले आहे यामुळे पाण्याची गळती थांबून अनधिकृत नळ कनेक्शनला आळा बसणार आहे.

वाकड-कस्पटेवस्ती परिसरातील नागरिकांची पाण्याची गरज लक्षात घेता स्थायी समिती सभापती ममताताई विनायक गायकवाड व मा.नगरसेवक विनायक गायकवाड हे या पाण्याच्या टाकीसाठी आग्रही होते. त्यामुळे आज झलेल्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ह्या २५ लाख लिटर पाण्याच्या टाकीच्या एकूण र.रु. रु.४,५८,६८,०२८ (चार कोटी अठ्ठावन्न लाख आडूसष्ठ हजार अठ्ठावीस) विषयास तत्काळ मंजुरी देत ह्या पाण्याच्या टाकीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असे निर्देश स्थायी समिती अध्यक्षा ममताताई विनायक गायकवाड यांनी संबंधित विभागास दिले.

Latest News