यांच्या हातात देश किती सुरक्षित ?

आमची 40 तरणी बांड पोर मारल्यावर त्यांची 300 आतंकवादी टाळकी  मारल्याची बातमी वाचल्यावर आनंद वाटला . त्यांनतर फेटा बांधून केलेले मोदींचे भाषण ऐकले .

एक पंतप्रधान म्हणून मी त्यांचा सन्मान करून सलूट करतो .पण त्यांचे भाषण ऐकून मनात पाल चुकचुकली .ते एक परिपक्व राजकीय मुत्सद्याचे न वाटता बॉलिवूड मधील हेरोचे वाटले     देश,मिट्टी, कसम, सक्षम हात,…! असे पट कथेतील शब्द होते .त्या पेक्षा दिसणारा अहंकार ,गुर्मी देश प्रमुखाची , हिताची वाटली नाही .मोदी हा माझ्या कुतूहलाचा विषय बनला तो 2002 गुजरात दंगली नन्तर त्यांनी काढलेली विजय मिरवणूक व त्यांच्यावर प्रदर्शित झालेली  डॉकुमेंटरी पाहिल्यावर .त्या दंगलीत मुस्लिम सह हिंदूही मारले होते ते सर्व भारतीय होते तरीही पठ्यांन विजय साजरा केला .सगळ्या जगाने निर्भस्तनां केली पण साधी दिलगिरीही व्यक्त केली नाही . म्हणून  विजय तेंडुलकरांनी  मोदींना गोळी घालण्याची जाहीर इच्छा व्यक्त केली होती.त्यांच्या आर्थिक धोरणांची तीच अवस्था .नोटबंदी मुळे 150 पेक्षा जास्त लोक मेले,या गड्याने ब्र शब्द काढला नाही .काश्मीरच सत्ता दिली .आमच्या पोरीटोरी यांच्याच काळात आमच्याच जवानांवर दगड मारायला लागले .आतंकवाद नष्ट करण्यासाठी यांनी नोटा बंदी आणली पण आमच्याच हद्दीत 200 किलो RDX आले त्यात आमची 40 पोर मारली गेली .यात पाक चा हात आहे पण नैतिक प्रशासकीय जबाबदारी आमची नाही का ? पुलवामा हल्ल्याला आम्ही चोख उत्तर दिले त्या वेळी अंगार ओकत सभा घेत बसलेल्या नेत्याला मुसद्दे गिरी दाखवता आली नाही .

आमचे 40 मारले तुमचे 400 मारले हे सांगून इम्रान व फुटीरतावादी ना चर्चेचे आवाहन करता आले असते .  नन्तर जरी आमचा स्कोड्रन लीडर पकडला असता तरी त्याला हात न लावणे बद्दल सांगण्याचा साऱ्या जगाला नैतिक अधिकार राहिला असता .मग आम्ही म्हटलो असतो की देश सुरक्षित /मजबूत नेत्याच्या हातात आहे .काश्मीर ही समस्या नाही .

RSS ही समस्या आहे तिला कस्मिर व पाक प्रश्न कायम जळत ठेवायचाय. खोटे राष्ट्र प्रेम जागृत ठेवत बहुजनातील पोरांनी वर्ण विषमते वर बोलू नये .जाती पेक्षा देश महत्वाचा हे सांगत ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व कायम राखता येईल यासाठी  मुस्लिम हा शत्रू कायम उभा करायचा!काश्मिरी पोरि पोरा सारखी आमची RSS व इतर पोर ही भाबडी आहेत .त्यांना दोष देण्यात अर्थ नाही .गेल्या 70 वर्षात RSS चा बुलडोझर कसा थांबवायचा याची व्यूह रचना कोणत्याही सरकार कडे नव्हती व नाही  .  RSS च्या माधवराव सरदेसाई नावाच्या पुण्याच्या उच्च वर्णीयाने  नरेंद्र नावाच्या शूद्र वर्णातील घंसी तेली जातीतील धाडसी ,महत्वकांक्षी,चतुर तरुणाला हाताशी धरून RSS च्या कामाला जुंपले .कुरुक्षेत्राचे तत्वज्ञान कोळून पिलेल्या या तरुणाने हे लक्षात ठेवले की “तुझा विजय झाला तर पृथ्वीवरचे राज्य करशील,मृत्यू आला तर स्वर्गात जागा पक्की !”.त्यामुळे असेल ,त्यांना मानवी रक्ताची किंमत वाटत नसावी .

हा गडी 18,18 तास काम करतो,करतो हे सांगतो, दाखवतो, जिकडे तिकडे फोटो लावतो .फकीर असल्याचे सांगतो व 11 लाखाचा कोट घालतो .ते सर्जिकल स्त्राईकच भांडवल करतात.त्यांना असे स्वताला कायम व दररोज सिद्ध ( prove himself ) का करावे लागते हा प्रश्न आहे. त्यांना शूद्र ,पिशाच भूत असा दर्जा देणारी भगवत गीता जगभर वाटतात व RSS शी नाते ठेवतात . निवडणुकीच्या वेळी ‘ हा मैं नीच जाती का हूं ‘असे अडवळणाने जाहीर करून देशातील OBC मते खेचून घेतात. ते जगभर दौरे काढतात .आपणास खरोखर पृथ्वीवर राज्य करायचे आहे असा त्यांना भास तर होत नसावा ?ही ‘बिहेवीरल डिसऑर्डर ‘सिंड्रोम कॉम्प्लेक्स  ….आहे का ?या वर अभ्यास करून आम्ही लवकरच अहवाल सादर करतोय (भक्तांनी शब्दसाठा राखून ठेवावा, कौतुकासाठी?). RSS विचाराने कँडीशनल केलेल्या व झालेल्या ,अशा ,पृथ्वीवर राज्य करण्याचे ,एक अवतार आहोत असा भास झालेल्या विभूती पासून आपले सैन्य ,देश वाचवीन्या साठी या पुढे ही लिहीत राहणार .ही तर सुरवात आहेकारण आपला देश योग्य माणसाच्या हातात असल्याचे दिसत असले तरी त्या हाताचे बोलविते व चालविते हात योग्य नाहीत  !कस्मिर प्रश्न पेटत ठेवण्याचे काम तेच हात गेले 70 वर्षे करतात . आपली सत्ता कायम ठेवण्याच्या आशेने पूर्वीच्या सरकारांनी ते मनगट पिरगळण्या ऐवजी कुरवळण्याचेच काम केले .ते आगलावे हात गाडून काश्मीर प्रश्नांची फेर मांडणी करावी लागेल ! आता पासून करावी लागेल नाहीतर पुढील पिढ्याना ती आणखीच अवघड बनेल !!!

WhatsApp chat