पीसीसीओईमध्ये स्पेक्ट्रम बक्षिस वितरण समारंभ

पिंपरी ः औद्योगिक क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान व विज्ञान शाखांनी समन्वय साधून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. देशाच्या विकासात आगामी काळात तंत्रज्ञान व विज्ञान क्षेत्राचे मोठे योगदान असेल. यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करणे याची जबाबदारी अभियांत्रिकी महाविद्यालयावर आहे, असे प्रतिपादन किर्लोस्कर कंपनीचे सरव्यवस्थापक संदीप निचळ यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात (पीसीसीओई) ‘स्पेक्ट्रम 2019’ या राज्यस्तरीय तांत्रिक स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात निचळ बोलत होते. यावेळी ईमरसन कंपनीचे व्यवस्थापक बी.बी. काळे, प्राचार्य डॉ. ए. एम. फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, डॉ. एस. एस. सोनार, प्रा. आर. टी .जगताप आदी उपस्थित होते.

या स्पर्धेत राज्यभरातून अभियांत्रिकीच्या 750 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये संशोधनाला चालना देणारे शोध निबंध एरोमॉडेलिंग, सी कोडर, ब्रेन डॅशर, रोबो सॉकर, सर्किट विझार्ट, मॉडेल मेकींग, टेक ट्रेझर हंट, लघुपट निर्मिती या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रा. आर.टी. जगताप, प्रा. अभिजीत कोरे, प्रा. प्रमोद सोनवणे, विद्यार्थी प्रतिनिधी नुपूर शितूरकर, अथर्व देशमुख, रक्षित झा, ऐश्‍वर्या एडके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आयोजन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्‍वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिस, स्मुती चिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. सुधांशू शिगाडे, प्रतिक्षा शिरसाठ, तनिषा बढे यांनी सुत्रसंचालन केले. श्‍वान पुल्लिकोटील, अथर्व देशमुख यांनी आभार मानले.

WhatsApp chat