महिलेला फेसबुकवरील मैत्री पडली महागात

सव्वादोन लाखांचा गंडा; तक्रार दाखल

मोशी ः फेसबुकवर मैत्री झालेल्या तिघाजणांनी मोशीतील एका 32 वर्षीय महिलेला गिफ्ट पाठवण्याचे आमिष दाखवून तब्बल 2 लाख 14 हजारांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी (दि. 6 मार्च) रोजी घडली. याप्रकरणी महिलेने सोमवार (दि. 9 एप्रिल) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मेकॉन वायने (वय 40) आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी 32 वर्षीय महिलेची आरोपी मेकॉन आणि त्याच्या साथीदारांसोबक फेबुकव्दारे ओळख झाली होती. यामुळे महिलेचा विश्‍वास संपादन करुन तिला गिफ्त पाठवल्याचे नाटक करत आरोपीने वेळोवेळी तिच्याकडून एकूण 2 लाख 14 हजार रुपये उकळले. मात्र, बरेच दिवस उलटून देखील गिफ्टही भेटले नाही. तसेच दिलेले पैसेही परत न मिळाल्याने महिलेला तिची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. तिने तातडीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस निरीक्षक कुंटे तपास करत आहेत.

Open chat