विरोधी पक्ष नेते दत्ता काका साने यांचा राजीनामा पक्षाकड़े सादर

विरोधी पक्ष नेते दत्ता काका साने यांचा राजीनामा
पिंपरी( प्रतिनिधी)!पिंपरी  -चिंचवड विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आज दिं. ९ रोजी आपला विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे .
  मात्र साने यांनी राजीनामा दिला असला तरी महापौर विदेश दौ-यावर असल्याने राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आला नाही.  साने यांनी विरोधी पक्षनेत्याचे उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली आहे. त्यांचा कार्यकाल संपल्याने अजित पवार यांनी राजीनामा देण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या . त्यामुळे दत्ता काका साने यांच्या यांचा विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा संजोग वाघेर यांनी तो स्विकारला

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीला सत्ता गमावावी लागली. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद आले होते. पक्षातील जास्तीत जास्त सदस्यांना संधी मिळावी या हेतूने एक वर्षासाठी नगरसेवकांना विरोधी पक्षनेतेपद संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठीकडुन घेण्यात आला.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपणाला विरोधी पक्षनेतेपदावर काम करण्याची संधी दिली. या संधी आपण गेल्या वर्षभरात सोने केले. सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार उजेडात आणण्यात आपल्याला यश आले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये पुन्हा राष्ट्रवादीची पाळेमुळे घट्ट होण्यास मदत झाली. विधानसभा निवडणुका तोंडावर असून आपण भोसरीतून लढण्यासाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक आहोत. पक्षाने विरोधी पक्षनेते पदाची मुदत वाढवून दिल्यास आपण या पदावर काम करून पक्षाची प्रतिमा आणखी उजळ करण्यास कटीबद्ध आहोत.असे साने यांनी सांगितले

Open chat