पुण्यातील पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांना 12 हजाराची लांच घेताना ACB कडून अटक

पुण्यातील उपनिरीक्षक कांबळे यांना 12 हजाराची लांच घेताना ACB कडून अटक
पुणे( प्रतिनिधी) -पुणे उत्‍तमनगर पोलिस ठाण्यातून न्यायालयात लवकरात लवकर दोषारोपपत्र (चार्जशीट) पाठविण्यासाठी लाचेची मागणी करून १२ हजार रूपयाची लाच स्विकारणार्‍या उत्‍तमनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. पुण्यात ही कारवाई झाल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, लाच प्रकणात अ‍ॅन्टी करप्शनचे पथक एका पोलिस कर्मचार्‍याचा शोध घेत आहेत.
पोलिस उपनिरीक्षक कृष्णराज के. कांबळे वय ५२ असे पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. न्यायालयात लवकर चार्जशीट दाखल करण्यासाठी उत्‍तमनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक कृष्णराज कांबळे आणि एका कर्मचार्‍याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनकडे तक्रार नोंदविली. प्राप्‍त तक्रारीची खातरजमा केल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक कांबळे आणि पोलिस कर्मचारी हे लाच मागत असल्याचे निष्पन्‍न झाले.
अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सापळा रचला. त्यावेळी लाचेची मागणी करणार पोलिस कर्मचारी शासकीय कामानिमित्‍त बाहेर गेला होता. त्याचवेळी सरकारी पंचासमक्ष पोलिस उपनिरीक्षक कांबळे यांनी तक्रारदाराकडून १२ हजार रूपयाची लाच स्विकारली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, शासकीय कामास गेलेल्या पोलिस कर्मचार्‍याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
शासकीय कर्मचारी, अधिकारी अथवा लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार द्यावी अन्यथा टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन पुणे विभागाचे अ‍ॅन्टी करप्शनचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे. ही सापळा कारवाई पोलिस अधीक्षक दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधिक्षक श्रीहरी पाटील आणि सापळा पथक:- श्रीमती सीमा मेहेंदळे पोलीस उपअधीक्षक,श्री. चंद्रकांत चौधरी, पोलीस निरीक्षक ,पो.हवा. नंदलाल गायकवाडसपोफौ करुणाकर, पो.ना. विनोद झगडे ,पो.ना. नवनाथ माळी .त्यांच्या पथकाने केली आहे.

Open chat