श्रावण हर्डीकर पिंपरी चिंचवड मनपा चे आयुक्त झाल्यापासून शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली

श्रावण हर्डीकर पिंपरी चिंचवड मनपा चे आयुक्त झाल्यापासून शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली – विशाल कसबे

पिंपरी:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त पदी श्रावण हर्डीकर रूजू झाल्यापासून शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय झाल्यापासून शहरात गुंडाची दहशत कमी झाली आहे, मात्र श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पदभार स्वीकारल्या पासूनच भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे कारण त्यांचा पशूवैद्यकिय विभागावर वचक राहिला नाही त्यामुळे पशूवैद्यकिय विभागाचे आधिकारी व कर्मचारी भटक्या कुत्र्यांच्या तक्रारी नागरिकांनी करुनही टाळाटाळ करत आहेत .
नसबंदीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची लूट करून खोटी आकडेवारी देत आहेत, मात्र शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे शाळेत मुले रस्त्याने जाण्यास घाबरत आहेत. रात्री कामावरून घरी येणार्या कर्मचार्यांना जीव मुठीत ठेवून यावे लागत आहे. कुत्री दुचाकीच्या मागे झुंडीने लागतात व अनेक लहान मुलांना, महिलांना चावा घेत आहेत यामुळे अनेक नागरिक भयभीत आहेत तरी आयुक्त बघ्याची भुमिका घेत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्त झाल्यापासून शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असा उपरोधिक टोला विद्यार्थी काँग्रेस चे अध्यक्ष विशाल कसबे यांनी लगावला.

Open chat