पिंपरी चिंचवड़ शहरात काँग्रेस पक्षाला एक जागा दया प्रदेश काँग्रेस कड़े मागणी :मनोज कांबळे

पिंपरी चिंचवड़ शहरात काँग्रेस पक्षाला एक जागा दया  प्रदेश काँग्रेस कड़े मागणी :मनोज कांबळे
*पिंपरी-चिंचवड शहराचा विकास हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यापक विचारसरणीतून झालेला आहे,या शहराचा नावलौकिक जगभर पसरवण्याचे काम आघाडी सरकारच्या माध्यमातून झालेले आहे.  त्यामुळे शहरात पक्ष जिवंत ठेवण्यासाठी एक तरी जागा काँग्रेस पक्षाला द्यावी अशी मागणी  मनोज कांबळे यांनी प्रदेश काँग्रेस ला  केली आहे
देशामध्ये आघाडीचे सरकार असताना jnrum योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत पिंपरी-चिंचवड शहराला देण्यात आली आहे, आणि याच पैशाच्या माध्यमातून शहराचा कायापालट व विकास झालेला आहे.  अजूनही या शहरांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा  मतदार मोठ्या प्रमाणात आहे.

*आपण आघाडी करताना काँग्रेस पक्षाला या शहरातील किमान एक मतदार संघ सोडावा.
जेणेकरून आघाडीचे उमेदवार चांगल्या प्रकारे एकोप्याने आणि  मोठ्या मताधिक्क्याने निवडून येण्यास दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जिवाचे रान करतील अन्यथा काँग्रेस पक्ष शहरात संपेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे
*पिंपरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्थानिक आणि पक्षासाठी सातत्याने झटणाऱ्या उमेदवारास प्राधान्य द्याव
काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या साथीने  या मतदारसंघांमध्ये विजयश्री खेचून येईल