पिंपरी विधांसभेतून भाजप बंडखोरांची माघार

  • भाजपचे अमित गोरखे, भीमा बोबडे व आरपीआय च्या चंद्रकांता सोनकांबळे यांचा अपक्ष अर्ज माघार

पिंपरी (दि. ७ ऑक्टोबर २०१९) :- राज्यात शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युती झाली आहे. त्यामुळे भाजपकडून पिंपरी विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला तर काहींनी बंड पुकारत अपक्ष अर्ज दाखल केले होते. त्यामुळे महायुतीच्याच अधिकृत उमेदवारांना धोका निर्माण झाला होता.

पिंपरीतून भाजपचे अमित गोरखे, भीमा बोबडे व आरपीआय च्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी अपक्ष अर्ज भरले होते. मात्र आज महायुतीच्या नेत्यांनी या तिघांची समजूत काढत त्यांना उमेवारी माघार घ्यायला भाग पाडले.

आज निवडणूक कार्यालयात जाऊन भाजपचे अमित गोरखे, भीमा बोबडे व आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी कार्यालयीन वेळेत आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले आहेत. आता पिंपरी मतदारसंघात खरी लढत महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादीचे उमेदवार आण्णा बनसोडे व वंचित आघाडीचे बाळासाहेब गायकवाड यांच्यातच होणार