69 हजार रुपयांच्या लाचप्रकरणी पोलिस निरीक्षकाला सक्तमजुरीची शिक्षा…

सोलापूर : गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 69 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणात मोहोळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यास आज मंगळवारी मे.जिल्हा न्यायालयाने चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे याने 85 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 69 हजार रुपये घेण्याचे ठरले. पोलिस ठाण्यामध्ये 69 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलिस निरीक्षक साळोखे यास रंगेहात पकडले होते. ही घटना 9 जून 2016 रोजी घडली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करून पोलिस निरीक्षक साळोखे याच्याविरोधात दोषारोपपत्र मे.न्यायालयात सादर केले होते. मंगळवारी या प्रकरणात मे.न्यायालय यांनी पोलिस निरीक्षक साळोखे यास चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी दिली.
साळोखे हे सध्या पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पोलीस चौकीत कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी मोहोळ पोलिस ठाण्यात कार्यरत असताना लाच प्रकरणात अटक झाली होती. पंढरपुरात आमदार भारत भालके यांच्याशी झालेला वादामुळे विश्वास साळोखे हे चर्चेत आले होते.