पुणे महामेट्रोचे काम पूर्ण होण्यापूर्वीच मेट्रोचे डब्बे पिंपरी चिंचवड मध्ये दाखल- डब्बे डोक्यावर घेऊन मिरवणार का ?

पुणे महामेट्रोचे काम पूर्ण होण्यापूर्वीच मेट्रोचे डब्बे पिंपरी चिंचवड मध्ये दाखल ; डब्बे डोक्यावर घेऊन मिरवणार का – शहरवासीयांचा सवाल

पुणे : पुणे महामेट्रोचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून महामेट्रो प्रशासनकडून वारंवार फक्त घाईच करताना दिसून येत आहे. त्याचाच प्रत्यय आज पिंपरी चिंचवड मधील शहरवासीयांना पाहायला मिळाला आहे. त्याचे असे की, पुणे महामेट्रोचे काम पूर्ण होण्यापूर्वीच मेट्रोचे डब्बे पिंपरी चिंचवड मध्ये दाखल झाले आहेत. मात्र हे डब्बे येथे आणून डोक्यावर फिरवणार काय ? असा प्रश्न शहरवासीयांकडून विचारला जातोय.
नववर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारी 2020 मध्ये ट्रायल रन घेण्याचा संकल्प मेट्रो प्रशासनाचा आहे. आज मेट्रोच्या सहा डब्ब्यांचे आगमन पिंपरी चिंचवड मधे झाले आहे . शहरात अनेक ठिकाणी कामे सुरू असल्याने नागरिकांना प्रचंड त्रासांना सामोरे जावे लागत आहे. मात्र महामेट्रो प्रशासन साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

पिंपरी ते स्वारगेट या मार्गावरील पिंपरी चिंचवड शहरातील पाच ते सहा किलोमीटरचे काम पूर्णत्वास झाले. त्याच पाच ते सहा किलोमीटरवर ही ट्रायल रन घेतली जाणार आहे. 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महामेट्रोच भूमिपूजन केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यांवर पुणे मेट्रोचे अपूर्ण काम चालू असताना तब्बल तीन वर्षांनी ही ट्रायल रन पार पडणार आहे. या तीन वर्षात केवळ 40 टक्केच काम पूर्ण झाल्याचं मेट्रो प्रशासनाकडून काही दिवसांपूर्वी सांगण्यात आलं होतं. पुणे मेट्रोच्या कामाची ही गती पाहता, काम पूर्ण व्हायला साधारण तीन ते चार वर्षाचा कालावधी लागू शकतोय. त्यामुळे पुढील महिन्यात मेट्रोची ट्रायल रन झाली तरी पुणेकरांना प्रत्यक्षात या मेट्रोतून प्रवास करायला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मग एवढी घाई कशासाठी हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.

Open chat