BJP आमदाराने पुरवल्या गाड्या? MLA लांडगेंनी दिले स्पष्टीकरण

आज मुंबईत पाकिस्तानी-बांग्लादेशी घुसखोरांविरोधात मनसेचा महामोर्चा मुंबईत होत आहे

पुणे- आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महामोर्चा होत आहे. या मोर्चात राज्यातील कानाकोपऱ्यातून मनसैनिक मोर्चात सहभागी झाले आहेत. यातच आता मुंबईला जाण्यासाठी भाजप आमदाराने गाड्या पुरवल्याचा आरोप होत आहे. पुण्यातील भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी मनसे कार्यकर्त्यांना वाहने पुरवल्याचा आरोप आहे. त्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी स्वत: स्पष्टीकरण दिले आहे.

वाहन पुरवल्याच्या आरोपावरुन एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले की, “माझा वाहतुकीचा व्यवसाय आहे. मी कंपन्यांना बस पुरवततो. आज रविवार असल्याने त्या गाड्या मनसेच्या कार्यकर्त्यांना दिल्या असतील. आम्हीसुद्धा भारतीय जनता पक्ष म्हणून सीएए आणि एनआरसीचे समर्थन करतो. त्या कार्यक्रमाला जाणारे कार्यकर्ते हे भाजपचे आहेत, की नाही हे मला माहीत नाही. पण, तिथे जाणारा माणूस हा सीएएलाच समर्थन करतोय, देशाच्या हितासाठी देशाच्या बाजूने त्याचं मत व्यक्त करत आहे. मग तो चांगल्याच कार्यक्रमाला गेला आहे. त्या चांगल्या कार्यक्रमासाठी माझ्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या कुणी वापरत असेल, तर माझी त्याला हरकत नाही.”

Latest News