जिंकलेले AAPचे आमदार ”नरेश यादव” यांच्या गाडीवर फायरिंग

नवी दिल्ली : महरौली विधानसभेमधून जिंकलेले आपचे आमदार नरेश यादव यांच्या गाडीवर मंगळवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फायरिंग केले. गोळी लागल्यामुळे त्यांच्या गाडीमध्ये बसलेल्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. घटना दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या किशनगड गावामध्ये रात्री सुमारे 11 वाजता झाली. घटनेवेळी यादव मंदिरातुन दर्शन घेऊन परतत होते. पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाचा सर्वच अँगलने तपास केला जात आहे.

मंगळवारी रात्री जेव्हा नरेश यादवची गाडी अरुणा आसिफ अली रोडवर एका ट्राफिक सिग्नलवर थांबली, तेव्हा इतका युवकाने मागून येऊन फायरिंग केले. ते म्हणाले, “ही घटना दुर्दैवी आहे. मला नाही माहित की, हल्ल्याचे कारण काय होते. पण हे खूप अचानक झाले. सुमारे 4 राउंड गोळ्या चालवल्या गेल्या. माझ्या गाडीवर हल्ला केला गेला, मला विश्वास आहे जर पोलिसांनी व्यवस्थित तपास केला तर हल्लेखोर नक्की समोर येईल.”

Latest News