राज्यात संचारबंदी लागू – मुख्यमंत्री ठाकरे सरकार चा आदेश

मुंबई प्रतिनिधी:

‘महाराष्ट्रात संचार बंदी जमावबंदी लागू’ देशात थैमान घातलेल्या कोरोनाचे महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्रकार परिषद घेऊन कोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कलम 144 सोमवारपासून लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही भागात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत.

5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. सध्या राज्यात 31मार्चपर्यंत मुख्यमंत्र्यांनी लॉक डाऊन असणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे. लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय ? लॉक डाऊन ही आपत्कालीन प्रणाली आहे, जी एखाद्या साथीच्या किंवा आपत्तीच्या वेळी अधिकृतपणे शहरात लागू केली जाते. कोरोनामुळे सध्या चीन, स्पेन आणि इटलीमध्ये लॉक डाऊन करण्यात आला आहे. चीनमधील परिस्थिती लॉक डाऊन केल्यानंतरच सुधारली आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासाठी नागरिकांनी बंधनकारक आहे. लॉक डॉऊनमध्ये लोकांना घरे सोडता येत नाहीत. तसेच 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमाव करून थांबता येत नाही. केवळ जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांना बाहेर पडण्याची परवानगी असते. यामुळे केले जाते लॉक डाऊन लॉक डाऊन ही आपत्कालीन परिस्थितीमध्ये लागू केली जाते. समाजात किंवा शहरात राहणाऱ्या स्थानिक लोकांना आरोग्यापासून किंवा इतर जोखमीपासून संरक्षित करण्यासाठी लॉक डाऊन केले जाते.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असून महाराष्ट्रात यामध्ये सर्वात आघाडीवर आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने हा निर्णय घेतला आहे. लोकल ट्रेन बंद कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेऊन मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. लोकल पूर्णपणे बंद न करता यामध्ये ओळखपत्र दाखवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना प्रवास करता येणार आहे.

मात्र, आता केंद्राने मोठा निर्णय घेत देशभरातील लोकल आणि रेल्वे गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईची लाईफ लाईन 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.

Open chat