प्रत्येक राज्यात लॉकडाऊन-केंद्राचा मोठा निर्णय……

⭕प्रत्येक राज्यात लॉकडाऊन; ⭕केंद्राचा मोठा निर्णय……

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व राज्यात करण्याचे निर्देश जारी केले आहेत. लॉकडाऊनचं पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचेही आदेश केंद्र सरकारने जारी केलेल्या पत्रकातून देण्यात आले आहेत. जनता कर्फ्यू यशस्वीपणे पाळल्यानंतर सोमवारी पुन्हा अनेक लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर नाराजी व्यक्त केली होती. काही राज्यात अगोदरच लॉकडाऊनचा निर्णय झाला आहे, पण केंद्र सरकारने या परिस्थितीमध्ये सर्वच राज्यांना लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान मोदींची नाराजी करोनाशी लढा देण्याच्या उद्देशाने लॉकडाऊन जाहीर केलेला असतानाही काही लोक याला गांभीर्याने घेत नाहीएत. कृपा करून तुम्ही स्वत:ला वाचवा, आपल्या कुटुंबाला वाचवा, आणि सूचनांचे पालन करा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ट्विट द्वारे केले. या बरोबरच राज्यातील सरकारांनी लॉकडाऊनचे नियम आणि कायद्याचे लोकांना पालन करण्यास भाग पाडावे असे निर्देशही मोदींनी दिले आहेत. करोनामुळे महाराष्ट्रात तिसरा मृत्यू मुंबईत करोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील करोनामुळे दगावलेल्यांची संख्या तीनवर पोहोचली आहे. त्याशिवाय राज्यात आणखी १५ नवे रुग्ण आढळले असून राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ८९वर गेली आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा रोजच वाढत चालल्याने परिस्थिती चिंताजनक होत चालल्याचं सूत्रांनी सांगितलं. राजस्थान, पंजाबमध्ये ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करोनाचा वाढता धोका लक्षात घेत राजस्थानंतर आता पंजाब सरकारनेही मोठा निर्णय घेत संपूर्ण राज्यात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी करोना विषाणूशी लढा देण्यासाठी प्रशासनाला मदत करा असे आवाहन जनतेला केले आहे. या पूर्वी पंजाब सरकारने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. यांमध्ये जालंधर, संगरूर असे जिल्ह्यांचा समावेश होता. परंतु, करोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या वाढत असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत संपूर्ण राज्यातच लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानातील गेहलोत सरकारने या पूर्वी करोना विषाणूच्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर रविवारपासून ३१ मार्चपर्यंत राज्यात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. लॉकडाऊन दरम्यान सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, मॉल, काराखाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असतात. तर, भाजीपाला, दूध आणि दररोज लागण्याच्या आवश्यक गोष्टींची दुकाने, तसेच मेडिकल

Open chat