corona वर मात करून आपल्याला विजयाची गुढी उभारायची आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधून सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या राज्यात गुढ्या, लेझीम, आणि पताकांनी बहर येतो. मात्र आज शांतात आहे. आपल्याला गुढीपाडवा साजरा करायचा आहे.

मात्र या संकटावर मात करून आपल्याला विजयाची गुढी उभारायची आहे.’ तसेच केवळ आजच नाही तर संपूर्ण वर्षभर आपण आनंदात आणि निरोगी राहो, अशा शुभेच्छा त्यांनी जनतेला दिल्या. हा शिवरायांचा लढवय्या महाराष्ट्र आहे. त्यामुळे आपण कोरोनाच्या संकटावर जिंकणारच. मात्र लक्षात घ्या युद्धामध्ये शत्रू आपल्यावर नकळत वार करतो. जेव्हा शत्रू आपल्याला दिसत नाही तेव्हा धोका अधिक असतो आणि कोरोनाचं संकटही असंच आहे. त्यामुळे आपण घराबाहेर न पडणे आवश्यक आहे. घराबाहेर पडून घरात कोरोना घेऊन येऊ नका. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच राहणार आहेत. त्यामुळे भाजीपाल्यासाठी झुंबड नको. जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी एकट्याने जा, असे आवाहनही त्यांनी केले.

Open chat