माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्याकडून गरजूंना धान्य वाटप

माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्याकडून गरजूंना धान्य वाटप

पिंपरी (प्रतिनिधी) : देशभर वाढलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. गोरगरीब नागरिकांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना अन्न धान्याची टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान नगरसेवक दत्ता काका साने यांनी आपल्या चिखली प्रभाग क्र. 1 मधील गरीब नागरिकांना धान्य वाटप करून मदतीचा हात दिला आहे. जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठगमनास जात असताना त्यांचा टाळ ज्या चिखली गावात पडला त्या टाळगाव चिखलीतील असा वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेले हे साने कुटुंब नेहमीच गरजू नागरिकांच्या मदतीस पुढे येत असते. या परिसरात हजारो परप्रांतीय व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील नागरिक उद्योग व्यवसायासाठी राहत आहेत. यातील बहुतांश नागरिक रोजंदारीवर काम करणारे व मोलमजूरी करून उदरनिर्वाह करणारे आहेत. त्यांचा लॉकडाऊनमुळे रोजगार बूडाला असून त्यांना आपल्या मुळगावी देखील जाणे शक्य होत नाही. या कुटुंबांची उपासमार होऊ नये म्हणून माणुसकी व कर्तव्याच्या भावनेतून दत्ता काका स्पोर्ट्‌स फाऊंडेशन व मित्रपरिवारच्या वतीने अशा गरीब 700 ते 800 कुटुंबांना रोज सकाळी 10 ते 12 या वेळेत धान्य वाटप करीत आहेत. जोपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील लॉकडाऊन उठत नाही तोपर्यंत आपण गरजू नागरिकांना मदत करणार आहोत, असे दत्ता काका साने यांनी सांगितले.