मुंबईच्या मरिन ड्राईव्हवर पोलिसांवर जीवघेणा हल्ला

मुंबई – स्वत:च्या जीवाची बाजी लावून कोरोनाविरोधात लढणाऱ्या पोलिसांना रस्त्यांवरील गुंडागर्दीचाही त्रास सहन करावा लागत आहे. शुक्रवारी (८ मे) रात्री एका तरुणाने कोयत्याने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना मरिन ड्राईव्ह येथे घडली. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम आणि पोलीस उपनिरीक्षक शेळके जखमी झाले असून आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. रात्री कोयता घेऊन आरोपी फिरत होता, म्हणून पोलिसांनी त्याला हटकलं. याचा राग आल्याने त्याने पोलिसांवरच हल्ला चढवला. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हातात कोयता असल्याने काही पोलीस कर्मचारी तरुणाचा पाठलाग करून त्याची समजूत काढत होते. मात्र त्यानो पोलिसांचे काहीही ऐकले नाही. म्हणून पोलिसांनी त्याला दोरी आणि लाठीच्या सहाय्याने आरोपीला अटक केली. म्हणून आरोपीने हातातील कोयत्याने वार केले, ज्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.

WhatsApp chat