पत्नीच्या भांडणात 5 महिन्याच्या चिमुरडीचा घेतला बळी

पिंपरी : पत्नीशी झालेल्या वादातून पतीने आपल्या पाच महिन्याच्या चिमुरडीचा गळा दाबून खून केला. ही घटना शनिवारी (दि.९) पहाटे पुण्यातील बावधन परिसरात घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या क्रुर घटनेने परिसरातील नागरीकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. संगिता बाबुराव जाधव (वय ५ महिने, रा. बावधन,पुणे) असे खून झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी बाबुराव याचे शुक्रवारी रात्री पत्नीशी घरगुती कारणावरून भांडण झाले. या रागातून त्याने स्वतःच्या पाच महिन्याच्या मुलीचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.