पवारांनी लिहिले मोदींना पत्र अन केली मागणी

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात देशाला आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. यावेळेस अर्थिक अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला मदत करण्यासाठी त्यांनी मोदींकडे पत्रव्यवहार केला आहे.. गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती ओढावल्यामुळे साखर उद्योग अडचणीत आहे. त्यातच आता कोरोनाच्या संकटामुळे साखर उद्योगाला घरघर लागण्याची शक्यता आहे. साखर उद्योगाला पुन्हा उभारी येण्यासाठी शरद पवारांनी मोदींकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारकडून दिलं जाणारं निर्यात प्रोत्साहन अनुदान मागील दोन वर्षांपासून केंद्राकडे प्रलंबित आहे, ते तात्काळ देण्यात यावं साखरेचा साठा करण्यासाठी देण्यात येणारा दोन वर्षांचा खर्च केंद्राकडून मिळाला नाही, ते देण्यात यावे साखरेची किमान विक्री किंमत सध्या 3100 रुपये आहे त्यात वाढ करून 3450 ते 3750 पर्यंत ग्रेड प्रमाणे वाढवून द्यावी मागील दोन वर्षात जेवढ्या ऊसाचं गाळप झालंय, त्या ऊसाला एक टन ऊसामागे 650 रुपये अनुदान द्यावी साखर कारखान्यांवरील कर्जाचे 10 वर्षांकरता पुनर्गठन करावं इथनॉलच्या उत्पादनासाठी डिस्टलरी सुरू करायला बँकांकडून कर्ज मिळावं अशा मागण्या शरद पवारांनी या पत्रात केल्या आहेत. साखर उद्योगावर देशातील ५ कोटींपेक्षा जास्त शेतकरी अवलंबून आहेत.

WhatsApp chat