30 हजार मेडिकलच्या जागा लवकरच भरणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : “राज्यातील कोरोनाचा वाढता कहर पाहता, राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील,” असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. “सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व जागा महिना-दीड महिन्यात भरणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.लॉकडाऊनच्या परिस्थितीत आरोग्य यंत्रणा मजबूत करणं आणि मनुष्यबळाची शंभर टक्के व्यवस्था करणे हे आमचं ध्येय आहे. कारण लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मेडिकल वर्कर्स काम करत आहेत. ते थकल्यानंतर नवीन टीम असली पाहिजे. तसंच अशा परिस्थितीत काही रिक्त जागा असू नयेत, याची खबरदारी घेऊन आम्ही या गोष्टी अत्यंत तत्परतेने करण्याचा निर्णय घेतला आहे,

WhatsApp chat