प्लाज्मा थेरपी यशस्वी झाली पुण्यातील ससून रुग्णालयात

पुणे : प्लाज्मा थेरपीवरून सुरू असलेल्या चर्चेच्या गुºहाळामध्ये एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ससून रुग्णालयामध्ये या थेरपीमुळे गंभीर अवस्थेतील एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. या रुग्णाला उच्च रक्तदाब, अतिस्थूलपणा व हायपोथायरॉइडिझम हे आजारही होते. त्यामुळे ही थेरपी कोरोनाबाधित रुग्णांसाठी वरदान ठरण्याची शक्यता आहे. रुग्णालयाने बुधवारपासून दुसऱ्या रुग्णावर ही थेरपी सुरू केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) काही दिवसांपूर्वी रुग्णालयाला प्लाज्मा थेरपीच्या चाचणीसाठी मान्यता दिली आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर १५ दिवसांपूर्वी दोन कोरोनामुक्त रुग्णांच्या रक्तातील प्लाज्मा काढण्यात आले होते. हा प्लाज्मा १० व ११ मे रोजी प्रतिदिन २०० एमएल या प्रमाणात एका बाधित रुग्णाला देण्यात आले. या रुग्णाला उच्चरक्तदाब, हायपोथायरॉइडिझम व अतिस्थूलपणा हे आजार असल्याने त्याची प्रकृती गंभीर होती. प्लाज्मा थेरपी सुरू झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. पंधराव्या दिवशी तपासणीत या रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले.

Latest News