बँक खात्यावर लाच घेणारे अधिकारी डॉ.अनिल रॉय, सुनील लोंढे व सुनील बेळगांवकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करा:- महापौर माई ढोरे

पिंपरी ( प्रतिनिधी ) पिंपरी चिंचवड महानगरपालिके तील बँक खात्यावर लाच घेणारे अधिकारी डॉ.अनिल रॉय, सुनील लोंढे व सुनील बेळगांवकर यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा:महापौर माई ढोरे यांनी आज आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आदेश दिला आहे तशी माहिती आज पत्रकार परिषेद घेऊन दिली.


तो पर्यंत त्याना सक्तीच्या रजेवर पाठवा असे महापौर कक्षामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर माई ढोरे म्हणाल्या. या पत्रकार परिषदेला उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, उपस्तित होते
भारतीय जनता पार्टी पक्षाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी पुराव्यासह बँक खात्यावर लाच घेणारे अधिकारी डॉ.अनिल रॉय, सुनील लोंढे व सुनील बेळगांवकर यांच्यावर केलेल्या आरोपाला समर्थन दिले. ढाके पुढे म्हणाले अधिकाऱ्यांनी बँक खात्यावर पैसे घेतले असतील त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही आयुक्तांना सांगितले आहे. अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार आहात का या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना महापौर यांनी अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणार आहे असे सांगितले.आता अधिकार्‍यावर आयुक्त काय कारवाई करणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
बँक खात्यावर लाच घेणारे अधिकारी डॉ.अनिल रॉय, सुनील लोंढे व सुनील बेळगांवकर यांच्यावर लवकर कारवाई करा:- महापौर माई ढोरे