भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना डेटा पाठवणारे ‘नमो’ अ‍ॅप बंद करा – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा परदेशातील कंपन्यांना पाठवणारे ‘नमो’ अ‍ॅप बंद केले पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. “130 कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे, म्हणून सरकारने 59 मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अ‍ॅप देखील बंद केले पाहिजे” असे ट्वीट पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अ‍ॅप्लिकेशनचा यात समावेश आहे.

भारतीय सार्वभौमत्व, संरक्षण, एकात्मतेबद्दल पूर्वग्रह दूषित असल्याचा ठपका ठेवत केंद्र सरकारने याबाबतचे कठोर पाऊल उचलले आहे. डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचललं असल्याचे बोललं जात आहे.

WhatsApp chat