पुणे: पेट्रोलची वाहतूक करणाऱ्या टॅंकरचा अपघात

पुणे – हडपसरमधील रामटेकडी पेट्रोल पंपासमोर मंगळवारी पहाटे पेट्रोल व डिझेलची वाहतूक करणाऱ्या टॅंकरचा अपघात झाला. टॅंकर पलटल्याने चालक जखमी अवस्थेत आत अडकला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी चालकाची सुटका केली आणि त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. अपघात झाला त्या टॅंकरमध्ये 15 हजार लिटर डिझेल आणि 5 हजार लिटर पेट्रोल भरलेले होते. त्यामुळे इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट होऊन आग भडकण्याची शक्यता होती. याची दक्षता घेत जवानांनी टॅंकरमधील इलेक्ट्रिक वायर कट केले तसेच सगळीकडे ‘फोम’चा मारा केला. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने टॅंकर सरळ केले आणि त्यातील पेट्रोल आणि डिझेल इतर टॅंकरमध्ये काढून घेत टॅंकर रस्त्याच्या बाजूला केला.

दुसर्या घटनेत कल्याणीनगर भागातही कल्याणी बंगल्यासमोर मंगळवारी दुपारी कारला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.

Latest News