सारथी ला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याचा निर्णय घेतला

मुंबई | सारथी संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सारथीची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठी समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. मराठा क्रांती मोर्चानं आंदोलनाचा इशाराही दिला होता. यानंतर आता ठाकरे सरकारनं ‘सारथी’ला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याचा निर्णय घेतला. सारथीला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याच्या मागणीसाठी वर्षभर आंदोलनं झाली. अखेर 9 ऑक्टोबर रोजी याबाबतचा आदेश पारित झाला. आता ‘सारथी’ला स्वायता बहाल करण्यात आली आहे.

Latest News