अभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल – अभिनेत्री रेशम टिपणीस आवर्जून उपस्थित

गेलं वर्ष लग्नाचं वर्षे होतं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कारण गेल्या वर्षात अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकले. आपल्या जोडीदारासह अनेकांनी जीवनाची नवी इनिंग सुरू केली. नववर्षाची म्हणजेच २०१९ची सुरूवातसुद्धा सनई चौघडेनं झाली आहे. आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री स्मिता तांबे ही आता लग्नबंधनात अडकली आहे. नाट्य कलाकार विरेंद्र द्विवेदीसह स्मिताचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. हे लग्न दोन पद्धतीने पार पडलं. मराठमोळ्या आणि उत्तर भारतीय पारंपरिक पद्धतीने हे शुभमंगल पार पडलं. यावेळी नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी स्मिताची खास मैत्रीण अभिनेत्री रेशम टिपणीस आवर्जून उपस्थित होती.

Latest News