महाराष्ट्राने अशा सुपारी सभा खूप बघितल्या:. शिवसेनेचे नेते सुभाष देसाई


औरंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना देसाई म्हणाले, “भोंगा आणि कमळ याआधी एकमेकांवर टीका करायचे; पण आता एकत्र आले आहेत, असा आरोप करत मनसेने याआधी मराठी आणि आता भोंगा काढला आहे. महाराष्ट्राने अशा सुपारी सभा खूप बघितल्या आहेत”भोंगा आणि कमळ सध्या एकत्र आलेले आहेत. भोंगा कमळाला किती त्रास देतो आणि किती साथ ते पहावं लागेल, अशी खोचक टीका शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी आज केली. मशिदींवरील भोंगे काढून टाकावे, अशी आक्रमक भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. त्याला भाजप पाठबळ देत आहे