रामभाऊ जाधव यांचा क्रीडावेध संस्थेच्यावतीने सत्कार


पुणे, प्रतिनिधी : छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांची पत्रकार उत्कर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल क्रीडावेध संस्थेच्यावतीने रामभाऊ जाधव यांचा कोट व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडावेध संस्थेचे संस्थापक देविदास राजपूत, अरविंद येवले, योग गुरू धनंजय जगताप, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश निकाळजे, सतीश बांदल, विकास मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ते कांबळे साहेब आदी उपस्थित होते. रामभाऊ जाधव यांनी छावा मराठा संघटनेच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य केले आहे. तसेच पत्रकार उत्कर्ष समितीच्या माध्यमातूनही त्यांनी पत्रकारांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवले आहेत. त्यांच्या या धडाडीच्या कार्याची दखल घेत क्रीडावेध संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.