उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शामभाऊ जगताप यांनी सादर केला कार्यअहवाल


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे शामभाऊ जगताप यांनी सादर केला कार्यअहवाल
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपळे गुरव प्रभाग क्रमांक 41 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रबळ इच्छूक उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर कार्याध्यक्ष शामभाऊ जगताप यांनी आपला कार्यअहवाल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सादर केला.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात हा कार्यअहवाल सादर केला. यावेळी अजितदादा पवार यांनी चांगले काम करत आहात, अशा शब्दात शामभाऊ जगताप यांच्या कार्याची स्तुती केली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिलाध्यक्ष कविताताई आल्हाट, माजी शहराध्यक्ष संजोग वाघिरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, तानाजी जवळकर, माजी नगरसेवक राजू लोखंडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, अनुसूचित जमाती सेलचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विष्णू शेळके, निलेश चव्हाण, गणेश फुगे, संकेत विधाते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.