ऋषी बंकिमचंद्र’ या चारित्रग्रंथाचे रविवारी सुनील देवधर यांचे हस्ते प्रकाशन

*’ऋषी बंकिमचंद्र’ या चारित्रग्रंथाचे**येत्या रविवारी दिनांक २६ रोजी सुनील देवधर यांचे हस्ते प्रकाशन*दिनांक २३( प्रतिनिधी )रविवार,दि.२६ जून रोजी

पुण्यात#ऋषी_बंकिमचंद्र या चरित्रग्रंथाचे प्रकाशन आणि सुप्रसिद्ध वक्ते, कृतिशील *राष्ट्रीय विचारवंत सुनील देवधर* यांचे “ऋषी बंकिमचंद्र” आजच्या संदर्भात या विषयावर व्याख्यान होणार आहे.तब्बल १२८ वर्षात ऋषी बंकिमचंद्र यांच्यावर एकही चरित्र प्रकाशित झाले नाही पण महिन्याभराच्या आत ऋषी बंकिमचंद्र या चरित्रग्रंथाची #दुसरी_आवृत्ती प्रकाशित होत आहे हे आनंददायी आहे.

फर्ग्युसन महाविद्यालयातील *अँम्फी थिएटर* मध्ये येत्या २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता प्रकाशन होणार आहे२५ मे रोजी ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात ऋषी बंकिमचंद्र या चरित्रग्रंथाचे थाटात प्रकाशन झाले होते,त्यानंतर महिन्यातच दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे.पुणे येथील राष्ट्रीय विचारांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात. आले आहें

Latest News