मी स्वार्थी नाही, मी मतलबी नाही. जेवढं मला भरभरून देता येईल त्यासाठी मी पूर्ण ताकद पणाला लावणार- उपमुख्यमंत्री अजित पवार


(ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
मी कामाचा माणूस आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कामे करण्यासाठी मी बारामतीत असतो. सहकार, कृषी, एक्ससाईज खाते आपल्याकडे आहे. तुम्हाला वेळेला कोण उपयोगी पडेल याचा विचार करा असे पवार म्हणाले.
कारखान्यात तुम्हाला सभासद केलं पण त्यांनी तुम्हाला विरोध केल्याचे अजित पवार म्हणाले. केंद्राचा, राज्याचा डीपीडीसीचा, सीएसआरचा निधीचा आपल्याला उपयोग होणार आहे.
तुमच्या मताला खूप महत्त्व आहे असे अजित पवार म्हणाले. मी आज maharashtra कारखाने चालवतो. 24 व्या वर्षी मी डायरेक्टर झालो. मुलगा डायरेक्टर आहे. माझं लग्न डायरेक्टर असताना झाल्याचे अजित पवार म्हणाले.
आपल्याला सहकाराला ताकद द्यायची आहे. रात्र वैऱ्याची आहे. थापांना बळी पडू नका असे अजित पवार म्हणाले. 22 तारखेपर्यंत मी इथेच आहे. आमचं अधिवेशन 30 जूनला सुरू होणार आहे.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी ब वर्ग संस्था मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली आहे.
बारामती खरेदी विक्री संघातून ते संस्था मतदार संघासाठी प्रतिनिधी म्हणून आले आहेत. तुमच्या समोर हात जोडतोय, कारण तुम्ही मतदार आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी कामाचा माणूस आहे. मी स्वार्थी नाही, मी मतलबी नाही.
जेवढं मला भरभरून देता येईल त्यासाठी मी पूर्ण ताकद पणाला लावणार आहे. अजित पवार चेअरमन होण्यासाठी हे बोर्ड आलं पाहिजे, माझ्यासाठी मतभेद बाजूला ठेवा अशी भावनिक सादही अजित पवारांनी घातली
. सहकारात सगळ्यांना सोबत घेऊन गेले पाहिजे. आपल्याला अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. जातीचा पातीचा विचार करू नका. पॅनेल टू पॅनेल मतदान करा असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत होते. आपण चांगला दर दिला आहे. विरोधक चुकीचे सांगून दिशाभूल करत असल्याचे अजित पवार म्हणाले. चेअरमनपद दोन कोटी पाच कोटीला विकले जात असल्याचा आरोप केला गेला.