महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. बारामती येथील अपघातग्रस्त विमानात अजितदादा पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

बारामतीत लँडिंग दरम्यान ही दुर्घटना झाली आहे.महाराष्ट्राच्या राजकारणातून दुःखद बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे
. मुंबईहून अजित पवार हे आज बारामतीकडे निघाले होते. बारामतीमध्ये उतरत असतानाच त्यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह त्यांचे चार सुरक्षारक्षक होते, अशी माहिती समोर आली आहे. विमान अपघातात अजित पवार यांच्यासह ०६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
