प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (RTO) ने एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ मध्ये १२ लाख ४१ हजार रूपये दंड वसूल

rto

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून देखील म्हणावी तसी सुधारणा दिसून येत नाही. त्यामुळे वाहन चालकांनी स्वयंशिस्तीने वाहतूक नियमांचे पालन करणे, हाच यावर प्रभावी उपय असल्याचे वाहतूक तज्ञाकडून सांगण्यात येत आहे.रस्त्याने जाताना सर्रासपणे दुचाकीस्वार ट्रिपल सीट वाहन चालवत असतात. यातून तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता जास्त असते. विशेष: पुणे शहरातील वाहतूक सर्वात जास्त बेशिस्त वाहतूक असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. या बेशिस्तपणाला आळा घालण्यासाठी आरटीओकडून अशी कारवाई करण्यात येते.प्रादेशिक परिवहन कार्यालय  PUNE (आरटीओ) ने एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ मध्ये या दहा महिन्यात ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या १ हजार २४१ जणांवर दंडात्मक कारवाई करत १२ लाख ४१ हजार रूपये दंड वसूल केला आहे. मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीवर दोन पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करणे बेकायदेशी आहे. त्यानुसारच या बेशिस्त ट्रिपल सीट वाहनचालकांवर प्रत्येकी १ हजार रूपये दंड आकारण्यात आले.

स्वंयशिस्तीने हा प्रकार थांबणार

नियम सुरक्षितता आणि अपघातांचा धोका कमी करण्यासाठी

  • ट्रिपल सीट प्रवास केल्यास १,००० चा दंड होतो.
  • मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार हा गुन्हा दाखल होऊ शकतो.
  • दंड भरण्याव्यतिरिक्त, आरटीओ गाडी जप्त करू शकतात किंवा लायसन्स जप्त करू शकतात.
  • चालकासह मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही हेल्मेट घालणे अनिवार्य आहे, अन्यथा अतिरिक्त दंड लागू शकतो.
  • दुचाकीचे संतुलन बिघडू नये आणि अपघात टळावेत, म्हणून हा नियम कडक करण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे भंग करणाऱ्यावर वेळोवेळी आरटीओकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. परंतु या दंडात्मक कारवाईचा उद्देश महसूल मिळवणे नसून, प्रवाशांची सुरक्षितता वाढवणे आहे. त्यामुळे दुचाकी स्वारांनी ट्रिपल सीट वाहन चालवणे टाळावे. स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षितेला प्राधान्य दयावे

स्वप्निल भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Latest News