हिंदू समाजात असे क्वचित निघतात, शासन सर्व पीडित महिलां बरोबर

rane

पिंपरी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)

भोंदूबाबा खरात याच्यावर कडक कारवाई केली जाईल. पीडित महिलांनी सरकारशी संपर्क साधावा. ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, त्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खंबीरपणे उभे आहेत.’ खरातप्रकरणी आपल्याला समाज माध्यमावर लक्ष केले जात असल्याबाबत विचारले असते मंत्री राणे म्हणाले,‘भोंदूबाबा अशोक खरात याने हिंदू धर्माचे नाव खराब केले आहे. हिंदू समाजात असे क्वचित निघतात. सरकार सर्व पीडित महिलांबरोबर आहे. खरात याच्यावर कडक कारवाई केली जाईल,’ अशी ग्वाही मत्स्य व्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यानी दिली

चिंचवड येथील संभाजीनगर येथे विराट हिंदू संमेलन रविवारी पार पडले. त्यानंतर मंत्री राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार अमित गोरखे या वेळी उपस्थित होते.

.‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जन्मशताब्दी वर्षे सुरू आहे. त्यानिमित्ताने राज्य आणि देशभरात हिंदू संमेलने आयोजित केली जात आहेत. यातून हिंदू समाजाला एकत्र आणले जात आहे. हिंदू राष्ट्राला आणखी भक्कम करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वजण एकत्र येत आहेत,’ असेही राणे यांनी सांगितले.‘मला कोणतेही लक्ष केले जात नाही. समाज माध्यमावर सगळ्याच प्रकारचे प्राणी असतात. त्यामुळे मी त्याचा विचार करीत नाही. मुस्लिम समाजाबाबत काही झाले, तर कोण बिळात बसतात हे आम्हालाही माहिती आहे. केवळ हिंदू धर्माची बदनामी करण्यासाठी काही लोकांना फार गुदगुल्या होत आहेत.’

Latest News