मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णाने बाथरूममध्ये आत्महत्या

मुंबई – मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोनाची लक्षणे असलेल्या ४३ वर्षीय रुग्णाने बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती पण त्याला कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने त्याला या रुग्णालयात ठेवले होते. मृत रूग्ण हे माहीम परिसरात राहत होते. ३१ मे पासून कोरोनाची लक्षणे दिसत असल्याने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे त्यांची कोरोनाची चाचणी घेतली होती. ही चाचणी निगेटिव्ह आली होती. तरी पण त्यांना सर्दी आणि तापअसल्यामूळे रुग्णालयातच ठेवले होते. त्यांची दुसरी चाचणीही केली आहे. पण तो रिपोर्ट येणे बाकी आहे. त्याआधीच त्यांनी रुग्णालयातील बाथरूममध्ये गळफास लावून
आत्महत्या हत्या केली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास बाथरूमचा दरवाजा बराच बंद दिसल्याने रुग्णालयातील आरोग्य अधिकाऱ्यांनी बाथरूमचा तोडला. त्यावेळी त्यांना आतमध्ये या रुग्णाने टॉवेलने गळफास लावून घेतल्याचे दिसून आले. रिपोर्ट निगेटिव्ह आला तरी लक्षणे असल्याने ते मानसिक तणावाखाली होते.

Latest News