रियावरील आरोप सिद्ध झाला नसून तोपर्यंत तिला दोषी ठरवू नये – विद्या बालन

मुंबई | अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले जात आहेत. मात्र अनेक सेलिब्रिटींनी रियाला पाठिंबा दर्शवला आहे. आता अभिनेत्री विद्या बालननेही आपल्या ट्विटर आकाउंटवरुन ट्विट करत रियाला पाठिंबा दर्शवलाय. लक्ष्मी मंचूने रियाला पाठिंबा दर्शवणारी एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने राजदीप सरदेसाई यांनी रियाच्या मुलाखतीचा उल्लेख केला आहे. त्यानंतर तिला प्रतिक्रिया देत विद्या बालनही या प्रकरणात आपलं मत व्यक्त केलं आहे. विद्याने संविधानाचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे. अद्याप रियावरील आरोप सिद्ध झाला नसून तोपर्यंत तिला दोषी ठरवू नये, असं विद्याने म्हटलंय.

दरम्यान, अभिनेत्री तापसू पन्नूनेही रियाला पाठिंबा दर्शविलाय. तिच्याविरोधात आरोप अद्याप सिद्ध झालेले नाही, त्यामुळे तिला दोषी ठरवू नये असं मत तापसीने व्यक्त केलं आहे.

Latest News