सत्तारुढ पक्षनेते नामदेवराव ढाके यांच्या गणेशमुर्ती दान व विसर्जन रथ उपक्रमात 470 मुर्तींचे संकलन

FB_IMG_1599039590269

सत्तारुढ पक्षनेते नामदेवराव ढाके यांच्या गणेशमुर्ती दान व विसर्जन रथ उपक्रमात 470 मुर्तींचे संकलन

बाप्पा आलेत आपल्या घरी… प्रभागातल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी; सेवकाच्या भुमिकेतुन आम्ही येतोय आपल्यादारी उपक्रमाला प्रभाग 17 मधील नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद

पिंपरी चिंचवड : यंदाच्या वर्षी कोरोनारूपी संकटाचं सावट असल्याने आपल्या बाप्पाचं विशेष स्थान मनात ठेवून आस्था व सामाजिक बांधीलकी या विशेष जबाबदारीने पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामदेवराव ढाके यांच्या संकल्पनेतुन, गणेशमुर्ती दान व विसर्जन रथ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभाग क्र. 17 मधील गणेश भक्तांसाठी राबविण्यात आलेल्या मुर्ती संकलन व विसर्जन रथ या उपक्रमाला प्रभागातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून 470 गणेश मुर्तींचे संकलन सेवकांनी केले.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दि. 26, 28, 30 व 31 अनंतचतुर्दशीला श्रींचे विसर्जन व मुर्तिदान घेण्यासाठी परिसरात हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमासाठी श्री. ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली शंकरराव पाटील, प्रदिप पटेल, कैलास रोटे, कुशल नेमाडे, चेतन महाले, योगेश महाजन, राहूल पाचपांडे, वसंत नारखेडे, कुणाल इंगळे यांनी सेवकांची भूमिका बजावली. गिरीराज कॉलनी, शिवनगरी, दगडोबा चौक, गणेश मंदिर, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, ओम कॉलनी, गजानन कॉलनी यासह बिजलीनगर परिसरातून गणेश मुर्तींचे संकलन करण्यात आले.

याबाबत प्रतिक्रीया देतांना श्री. ढाके म्हणाले की, आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी सेवकांचे मोबाईल नंबर दिले. तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातूनही घरोघरी जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमांतर्गत भाविकांनी आपल्या श्रींचे विसर्जन आपल्या हातुन विसर्जन रथात केल्यानंतर दान केलेल्या श्रींचे पावित्र राखत गणरायांची धार्मिक रितीरिवाजानुसार महानगरपालिकेने नेमुन दिलेल्या जागेपर्यंत नेण्याची पुर्ण जबाबदारी आम्ही घेतली. तसेच श्रींचे निर्माल्यासाठी वेगळी व्यवस्थाही केली. विसर्जन घाटाचा अनुभव भाविकांना आपल्या दारापर्यंत आणण्याचं व गणरायांचं पावित्र्य जपण्याच्या उद्दीष्टपुर्ती करिता हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. याचबरोबर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पूरेपूर पालन केल्याचे नामदेवराव ढाके यांनी यावेळी सांगितले.

Latest News