मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला संपवण्याचा प्रयत्न

जळगाव | मी मुख्यमंत्री पदाचा दावेदार असल्यामुळे मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र मी सहजासहजी संपणारा राजकारणी नाही, असं वक्तव्य भाजप नेते एकनाथ खडसेंनी केलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. माझ्यावरचे खोटे आरोप आतापर्यंत सिद्ध करू शकले नाही. जाणीवपूर्वक मला पदावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. भ्रष्ट लोकांना पक्षामध्ये घेतलं. मात्र ज्यांनी चाळीस वर्ष जिवाचं रान केले त्यांच्या जीवाची कदर नाही का?, असा सवाल खडसेंनी केला आहे. ज्यांना तिकीट दिली त्यांना हरवलं. माझं तिकीट कापलं, माझ्या मुलीला हरवण्यासाठी प्रयत्न केला. याबबतचे सर्व पुरावे मी दिले आहेत तरी देखील कारवाई होत नाही?, असं एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. दरम्यान, अनेकांवर घोटाळ्यांचे आरोप झालेत सर्वांना क्लीन चिट मिळते. मग मला का क्लीनचिट मिळत नाही, असंही खडसे म्हणाले.

Latest News